Jitendra Awhad : पुणे कोयता हल्ला प्रकरणात तरुणीला वाचवणाऱ्या तरुणांना आव्हाडांनी जाहीर केलं मोठं बक्षिस
Jitendra Awhad : पुणे कोयता हल्ला प्रकरणात तरुणीला वाचवणाऱ्या तरुणांना आव्हाडांनी जाहीर केलं मोठं बक्षिस 27 जून : दर्शना पवार हत्याकांड ताजं असतानाच आता पुण्यात आणखी एका तरुणीवर कोयत्यानं हल्ला करण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमातून या तरुणानं तरुणीवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. पुण्याच्या सदाशिव पेठ भागातील ही घटना आहे. या हल्ल्यातून तरुणी थोडक्यात बचावली ती दोन तरुणामुळे . एकानं हल्ला केला, तर तिथून जाणाऱ्या दुसऱ्या तरुणानं प्रसंगावधान दाखवत तिचा जीव वाचवला . या घटनेनंतर या दोन तरुणांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या दोघांना प्रत्येकी 51 हजार रूपयायंचं बक्षिस फेसबुकवरुन जाहीर केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक पोस्ट काय? माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या दोन तरुणांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे . आव्हाड यांनी फेसबुकवर लिहिलंय, की पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी आपले प्राण धोक्यात घालून आज एका मुलीचा जीव वाचवला, या दोन्ही तरुणांना...