​नाद करा पण आमचा कुठं! शेतकऱ्याचा

 

​नाद करा पण आमचा कुठं! पुण्यातल्या शेतकऱ्यानं १६ लाखांच्या गाडीनं नांगरलं शेत, व्हिडीओ व्हायरल..


एक अतरंगी जुगाड आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. एका तरुणानं चक्क महिंद्रा थारच्या मदतीनं तब्बल १ एकर शेत नांगरलं. त्यानं आपल्या गाडीच्या पाठीमागे नांगर लावला अन् गाडी फुल्ल स्पीडमध्ये पळवली. हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल.

जुगाड करण्याच्या बाबतीत भारतीयांचा हात कोणीच धरू शकत नाही. एखादी गोष्ट नसेल तर भारतीय लोक शांत बसत नाहीत. तर त्या गोष्टीचा पर्याय शोधून काढतात. त्यामुळेच आपल्या देशात असे असे जुगाड पाहायला मिळतात ज्यांची कल्पना मोठमोठे वैज्ञानिक सुद्धा करू शकत नाही. असाच एक अतरंगी जुगाड आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. एका तरुणानं चक्क महिंद्रा थारच्या मदतीनं तब्बल १ एकर शेत नांगरलं. त्यानं आपल्या गाडीच्या पाठीमागे नांगर लावला अन् गाडी फुल्ल स्पीडमध्ये पळवली. हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल. (फोटो 

ट्रॅक्टर ऐवजी थार गाडीनं करतोय नांगरणी..


घटना पुण्यातील इंदापूर या ठिकाणी घडली आहे. 
 या ठिकाणी एका शेतकऱ्यानं नांगर थेट आपल्या गाडीला बांधला आणि १ एकरचं क्षेत्र नांगरून काढलं.
 शेतामध्ये गाडी चालवणं हे फारच कठीण काम असतं. कारण शेतीची जमिन ही उंच सखल दगड धोंड्यांनी भरलेली असते.
 अशा ठिकाणी गाडीचा तोल जाऊन अपघात होण्याची देखील शक्यता असते. 
पण महिंद्रा थार ही गाडी मुळातच अशा उंच सखल भागात चालवण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे.
 त्यामुळे नांगरणी करणं तुलनेत सोपं गेलं असावं असा कयास नेटकरी लावत आहेत


Comments

Popular posts from this blog

सख्या बहिणी बनल्या PSI, घरातील चौघेही अधिकारी; अंजली बाबर राज्यात दुसऱ्या

Tata Group करणार भारतातील पहिल्या iphone ची निर्मिती; ऑगस्ट महिन्यात करार होणार पुर्ण

महिन्याभरातच टोमॅटो ने केले करोडपती, या शेतकऱ्याला लागली लॉटरी!