ओडिसा मध्ये समोरासमोर रेल्वेचा अपघात
आजवरचा सर्वात मोठा अपघात, रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 233 वर, 900 प्रवासी जखमी; मदतकार्य अजूनही सुरूच
ओ डिशाच्या बालासोर या ठिकाणी झालेल्या कोरोमंडल ट्रेन अपघातात २३३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेविषयी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे.
की मदतअपघात इतका भीषण होता की मदत आणि बचावकार्य करणाऱ्या एनडीआरएफच्या पथकाला गॅस कटरच्या मदतीने मृतदेह काढावे लागत आहेत. हा अपघात पाहणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने त्याने पाहिलेली परिस्थिती सांगितली आहे जी अंगावर काटा आणणारी आ आ
णि बचावकार्य करणाऱ्या रात्र बरीच झाली होती त्यामुळे माझ्यासह जवळपास सगळेच प्रवासी झोपले होते. त्याचवेळी गाडी घसरली. मोठा आवाज झाला आणि मी झोपेतून एकदम जागा झालो. मी पाहिलं माझ्या अंगावर १०, १५ माणसं पडली होती. मी दबला गेलो होतो. मी कसबसा त्यातून बाहेर पडलो. किती लोकांचा मृत्यू झाला ते मला माहित नाही. पण मी जेव्हा बोगीतून बाहेर पडलो तेव्हा पाहिलं कुणाचा हात नव्हता, कुणाचा पाय कापला गेला होता. लोक किंचाळत होते, ओरडत होते, मदत मागत होते. माझ्या हाताला आणि मानेला जखम झाली आहे. पोलीस आणि इतर टीम त्या ठिकाणी आल्या त्यांनी लोकांना वाचवण्यास सुरुवात केली.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. “ओडिशा ट्रेन अपघात वेदनादायी आहे. माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबीयांसह आहेत. जे अपघातात जखमी झाले आहेत त्यांना लवकर आराम मिळावा म्हणून मी प्रार्थना करतो. तसंच अपघात झालेल्यांना लवकरात लवकर सगळी मदत मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहोत.” या आशयाचं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे..
Comments
Post a Comment