कापूस आत्ताच विका असं उद्योग म्हणतोय cotton rate

 

कापूस बाजार भाव चांगला हवा असेल तर कापूस आत्ताच विका असं उद्योग म्हणतोय cotton rate











मागील वर्षी कापूस बाजार भाव cotton rate चांगले मिळाल्याने देशातील अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस मागे ठेवला आहे. अशा परिस्थितीत सदर्न इंडिया मिल्स असोसिएशनकडून ( सिमा ) या कापूस संस्थेकडून शेतकऱ्यांना कापूस विकण्याचे आव्हान केले गेले आहे. पण शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नसल्याने, देशभरातील शेतकऱ्यांनी आपला कापूस मागे ठेवला आहे. मग नेमकं या कापूस संस्थेकडून असे आवाहन शेतकऱ्यांना का केले जात आहे. यामागे कोणते कारणे आहेत? चला तर पाहूया या संपूर्ण लेखात उद्योग शेतकऱ्यांना कापूस विकण्यास का सांगत आहे.



हेही वाचा; मुख्यमंत्र्याचा हा निर्णय 15 दिवसाच्या आत होणार नुकसान भरपाई जमा.



शेतकऱ्यांना कापूस बाजार भाव cotton rate चांगला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी पावसाळ्यापूर्वीच आपला कापूस विकावा असे निवेदन सदर्न इंडिया मिल्स असोसिएशनकडून ( सिमा ) या कापूस संस्थेकडून करण्यात आले आहे. सीमा ही दक्षिण भारतातील सूत गिरण्या ची सर्वोच्च संस्था आहे. अद्याप देखील बऱ्याच शेतकऱ्याकडे आपला कापूस शिल्लक असल्याने, सीमाचे अध्यक्ष रवी सॅम यांच्याकडून सांगण्यात आले की पावसाळ्यात कापूस प्रक्रिया अवघड असते. यासह पावसाळ्यात कापसाचा दर्जा कमी होऊन भाव कमी मिळू शकतो. या कारणामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस लवकरात लवकर विकणे उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी चांगले आहे असे रवी म्हणाले.

कापूस बाजार भाव
नमो शेतकरी महासन्मान निधी

हेही वाचा; कुसुम सोलर योजना टप्पा दोन नवीन नोंदणी सुरू सविस्तर पहा.

कापूस बाजार भाव जून मध्ये देखील अशाच प्रकारे राहू शकतात, असे सीमाचे अध्यक्ष रवी सॅम यांचे मत आहे. यंदा देशातील आवक पाहता चालू हंगामात रोज 1 लाख 30 हजार गाठीच्या दरम्यान आवक झाली. हंगामाच्या शेवटी कापूस cotton उद्योगांना कापसाची टंचाई बसू शकते. यासाठी अतिरिक्त लांब धाग्याच्या कापूस आयातीवरील शुल्क काढावे अशी मागणी रवी सॅम यांच्याकडून केली आहे.

हेही वाचा आज मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे सरकारचे शेतकऱ्यांसाठी मोठे दोन निर्णय.


यंदा देशातील अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस मागे ठेवल्याने, जून महिना सरत आला तरी कापसाची आवक जास्त आहे. शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी कापूस विकत असल्याचे सांगत आहेत. पावसाळ्यात कापूस साठवणीसाठी अवघड जाते याचं काही शेतकऱ्यांना कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्याचे सांगतात. यामुळे पावसाळ्यापासून साठवून ठेवलेला कापूस सध्या कमी किमतीत शेतकरी विकत असल्याचे दिसून येतोय.

Post navigation
Previous PostNext Post

Leave a Comment
Your email address will not be published. Required fields are marked *


Type here..
Type here..
Name*
Name*
Email*
Email*
Website
Website
 Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

कापूस बाजार भाव1 जून देशातील कापूस बाजार भाव सध्या इतका मिळतोय दर cotton rate
गुजरात कापूस बाजार भावNEW आजचे गुजरात कापूस बाजार भाव 1 जून 2023 Cotton rate
कापूस बाजार भावNEW आजचे कापूस बाजार भाव 1 जून 2023 Cotton rate
मका बाजार भावNEW आजचे मका बाजार भाव 1 जून 2023 Makka Bajar bhav
ज्वारी बाजार भावNEW आजचे ज्वारी बाजार भाव 1 जून 2023 sorghum Rate
Copyright © 2023 aii rights reserved
यंदा देशातील अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस मागे ठेवल्याने, जून महिना सरत आला तरी कापसाची आवक जास्त आहे. शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी कापूस विकत असल्याचे सांगत आहेत. पावसाळ्यात कापूस साठवणीसाठी अवघड जाते याचं काही शेतकऱ्यांना कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्याचे सांगतात. यामुळे पावसाळ्यापासून साठवून ठेवलेला कापूस सध्या कमी किमतीत शेतकरी विकत असल्याचे दिसून येतोय.

Comments

Popular posts from this blog

अक्षय चौरे यांच्या शेतातील कामाचा विक्रम

शेती कामासाठी लागणारे जुगाड

सख्या बहिणी बनल्या PSI, घरातील चौघेही अधिकारी; अंजली बाबर राज्यात दुसऱ्या