दर्शना पवार… पोरी चूक तुझीच आहे

दर्शना पवार… पोरी चूक तुझीच आहे

तुझी पुढची चूक म्हणजे तू चक्क एका पुरूषाला लग्नाला नकार दिलास… बाई गं, किती मोठी घोडचूक करून बसलीस तू. घोडचूक कसली, जीवघेणी चूकच म्हणायला हवी ही
दर्शना पवार, तू हकनाक जीवानिशी गेलीस म्हणून सगळं जग हळहळतंय. तुला ओळखणाऱ्यांचं काळीज किती
 हललं असेल ते समजण्यासारखं आहे, पण तुला न ओळखणाऱ्याच्या हृदयालाही चटका बसल्यासारखंच झालंय गं तुझी कर्मकहाणी समजल्यावर. आपल्याच कुणावर तरी अशी वेळ आली तर व्हाव्यात तशा वेदना आहेत या.

इतक्या विपरित परिस्थितीमधली गर्ल नेक्स्ट डोअर झालीस ते तुझ्याच चुकांमुळे हे माहीत आहे का मुली तुला?

तुझी पहिली चूक म्हणजे तू या समाजात मुलगी म्हणून जन्माला आलीस. आपल्याकडे सन्मानाने जन्माला यायचा हक्क फक्त मुलग्यांनाच आहे, हे तुला जन्माच्या आधीच माहीत असायला हवं होतं. तरीही तुझ्या आईवडिलांनी तुला जन्माला घातलं आणि शिक्षण दिलं.

पण तू दुसरी चूक करून बसलीस. ती म्हणजे हुषार

तुझी पहिली चूक म्हणजे तू या समाजात मुलगी म्हणून जन्माला आलीस. आपल्याकडे सन्मानाने जन्माला यायचा हक्क फक्त मुलग्यांनाच आहे, हे तुला जन्माच्या आधीच माहीत असायला हवं होतं. तरीही तुझ्या आईवडिलांनी तुला जन्माला घातलं आणि शिक्षण दिलं.


पण तू दुसरी चूक करून बसलीस. ती म्हणजे हुषार निपजलीस. लाखो विद्यार्थी एमपीएससीची परीक्षा पास होऊन सरकारी अधिकारी होण्यासाठी आपल्या तरूणपणामधली मौल्यवान वर्षे अभ्यासात घालवत

तुम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखत होतात म्हणे. तू त्याच्याकडे साधी नजर टाकणं हीदेखील त्याच्या दृष्टीने संमतीच असते पोरी. मग बोलणं, भेटणं एकत्र काहीतरी करणं हे तर त्याच्या दृष्टीने संमतीचे किती पुढचे टप्पे गाठलेस तू. आता तर तू फक्त आणि फक्त त्याचीच, हे त्याने ठरवून टाकलं आणि मग तू त्याला नकार देण्याची हिंमत केलीस तरी कशी ?



Comments

Popular posts from this blog

सख्या बहिणी बनल्या PSI, घरातील चौघेही अधिकारी; अंजली बाबर राज्यात दुसऱ्या

Tata Group करणार भारतातील पहिल्या iphone ची निर्मिती; ऑगस्ट महिन्यात करार होणार पुर्ण

महिन्याभरातच टोमॅटो ने केले करोडपती, या शेतकऱ्याला लागली लॉटरी!