Jitendra Awhad : पुणे कोयता हल्ला प्रकरणात तरुणीला वाचवणाऱ्या तरुणांना आव्हाडांनी जाहीर केलं मोठं बक्षिस
Jitendra Awhad : पुणे कोयता हल्ला प्रकरणात तरुणीला वाचवणाऱ्या तरुणांना आव्हाडांनी जाहीर केलं मोठं बक्षिस
27 जून : दर्शना पवार हत्याकांड ताजं असतानाच आता पुण्यात आणखी एका तरुणीवर कोयत्यानं हल्ला करण्यात आला आहे.
एकतर्फी प्रेमातून या तरुणानं तरुणीवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.
पुण्याच्या सदाशिव पेठ भागातील ही घटना आहे. या हल्ल्यातून तरुणी थोडक्यात बचावली ती दोन तरुणामुळे
. एकानं हल्ला केला, तर तिथून जाणाऱ्या दुसऱ्या तरुणानं प्रसंगावधान दाखवत तिचा जीव वाचवला
. या घटनेनंतर या दोन तरुणांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या दोघांना प्रत्येकी 51 हजार रूपयायंचं बक्षिस फेसबुकवरुन जाहीर केलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक पोस्ट काय? माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या दोन तरुणांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे
. आव्हाड यांनी फेसबुकवर लिहिलंय, की पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी आपले प्राण धोक्यात घालून आज एका मुलीचा जीव वाचवला, या दोन्ही तरुणांना माझ्याकडून प्रत्येकी 51,000/- रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे.
बक्षीसाने त्यांच्या धाडसाचे मूल्य करता येणार नाही.पण, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत नक्कीच होईल.
काय आहे घटना? एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात ही तरुणी जखमी झाली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून पीडित मुलीला त्रास देत होता.
अनेकदा त्याला समजावून देखील सांगण्यात आले होते. त्याच्या आई-वडिलांना या सर्व प्रकरणाची कल्पना देण्यात आली होती. मात्र, एवढं होऊन देखील आरोपीने मुलीला फोन करून धमकी दिली. प्रेमसंबंधास नकार, विवाहितेने बॉयफ्रेंडला पुण्यातून केलं किडनॅप, गुजरातला हॉटेलवर नेऊन.. धमकी देण्यात आल्यानंतर पुन्हा मुलीच्या आईने या मुलाला समजावून सांगितलं.
Comments
Post a Comment