2023MHT CET परीक्षेचा निकाल अखेर जाहीर ..
2023MHT CET परीक्षेचा निकाल अखेर जाहीर ..
मुबई, 12, जून: MHT CET 2023 चा निकाल आज महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलद्वारे जाहीर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीईटीचा निकाल आज 12 जून रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार होता.
मात्र त्या आधीच हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल फिजिक्स, केमिस्ट्री, गणित (PCM) आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) ग्रुप्ससाठी निकाल जाहीर केला आहे. निकाल MHT CET 2023च्या वेबसाइटवर cetcell.mahacet.org वर तपासता येतील.निकाल तपासल्यानंतर त्याची प्रिंट काढा. परीक्षा न देता विद्यार्थी पास, पीएचडी सुरू! परीक्षा देऊन विद्यार्थिनी मात्र नापास MHT CET 2023 चा निकाल जाहीर झाल्यानंतर काउन्सलिंग केलं जाईल. याद्वारे इंजीनिअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे. काउन्सलिंग सुरू होण्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. यंदा अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची सर्व प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहेत. यंदा पहिल्यांदाच मोबाईल ॲपमार्फत उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती मिळणार आहे, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.
Comments
Post a Comment