Posts

Showing posts from July, 2023

महिन्याभरातच टोमॅटो ने केले करोडपती, या शेतकऱ्याला लागली लॉटरी!

Image
 महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने टोमॅटो या पिकातून कमवले 1.5 कोटी.. Tomato Price : महिन्याभरातच टोमॅटो ने केले करोडपती, या शेतकऱ्याला लागली लॉटरी! दरवर्षी भाव नसल्याने रस्त्यावर फेकून दिल्या जाणाऱ्या टोमॅटोने आता कमाल केली आहे. टोमॅटोने झेप घेतल्याने अनेक शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे.  हा शेतकरी तर अवघ्या एका महिन्यात करोडपती झाला आहे अनेक जण नशीब आजमावतात, त्यांना लॉटरी लागते. त्यांचे नशीब उघडते. पण या शेतकरी दाम्पत्याने मेहनतीच्या आणि संधीच्या जोरावर दौलत खेचून आणली आहे.  टोमॅटोचे भाव (Tomato Price Hike) सध्या आकाशाला भिडले आहेत. भाव नसल्याने दरवर्षी रस्त्याच्या कडेला टोमॅटो फेकून द्यावा लागत होता जून्नरमधील शेतकरी करोडपती पुणे आणि नगर जिल्ह्यातील सीमेवर जून्नर तालुका आहे. हा तालुका ग्रीन बेल्ट नावाने राज्यात ओळखल्या जातो.  या तालुक्यात अनेक प्रयोगशील शेतकरी आहे. मुबलक पाणी आणि कल्पकतेच्या जोरावर येथील शेतकऱ्यांचे अनेक प्रयोग राज्यभर गाजले आहे. राज्यातील सर्वांधिक पाणलोट आणि सिंचन याच तालुक्यात आहे. तर याच गावातील शेतकऱ्याने टोमॅटो विक्रीतून तीस दिवस कोट्यावधी रुपये कमावले आहे .काळ्या म

Tata Group करणार भारतातील पहिल्या iphone ची निर्मिती; ऑगस्ट महिन्यात करार होणार पुर्ण

Image
Tata Group करणार भारतातील पहिल्या iphone ची निर्मिती; ऑगस्ट महिन्यात करार होणार पुर्ण बिझनेसनामा ऑनलाईन ।  सध्या टाटा समूह (Tata Group) देशातील मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर जास्त प्रमाणात भर देत आहे. नुकतीच टाटा समूहासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. टाटा समूह आता आयफोन निर्मितीच्या मार्गावर आहे. यासंदर्भात टाटा समूह कर्नाटकमधील विस्ट्रॉन कॉर्पसोबत करार करण्याच्या तयारीत आहेत. हा करार ऑगस्ट महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 14 आयफोन मॉडलचे असेंम्बलिंग करणार – (Tata Group) जर या दोन्ही कंपन्यांचा करार निश्र्चित झाला तर टाटा समूह (Tata Group)आयफोन निर्माण करणारी भारतातील पहिली कंपनी ठरेल. त्यामुळे लवकरच आपल्याला बाजारात टाटा समूहाचा पहिला आयफोन पाहिला मिळू शकतो. मुख्य म्हणजे, या प्रकल्पाचे मुल्य ६० कोटी डॉलरपेक्षा अधिक असेल. तसेच या प्रकल्पात १४ आयफोन मॉडलचे असेंम्बलिंग केले जाईल. 10, 000 पेक्षा अधिक लोकांना बेरोजगार मिळणार- टाटा समूहाच्या या करारामुळे देशातील १०,००० पेक्षा अधिक लोकांना बेरोजगार मिळणार आहे. पुढील वर्षापर्यंत कर्नाटक येथील प्रकल्पात १.८ अब्ज डॉल

शेतकऱ्याच्या पोरांचा नांदच खुळा..!

Image
शेतकऱ्याच्या पोरांचा नांदच खुळा..! शेतकऱ्यांसाठी शोधलं अत्याधुनिक फवारणी यंत्र, हा बारामाही चालणारा व्यवसाय आहे. शेतीमध्ये पिकांच्या वाढीसाठी आणि रोगापासून पिक संरक्षणासाठी नेहमीच वेगवेगळ्या कीटकनाशकांची (Pesticides) फवारणी शेतकरी बांधवांना (Farmer) करावी लागते. शिवाय अनेक तणनाशकांची आणि बुरशीनाशकांची देखील फवारणी शेतकऱ्यांना करावी लागते.   त्यामध्ये असलेले खतरनाक रासायनिक घटकांमुळे अनेकदा फवारणीच्या वेळी शेतकऱ्यांच्या आरोग्याला गंभीर परिणाम होतात. शेतकरी बांधवांना फवारणी करताना या समस्येला तोंड द्यावे लागतं असल्याने नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या शेतकऱ्याच्या पोरांनी चक्क अत्याधुनिक फवारणी विकसित केले आहे ह्या यंत्राचा पूर्ण व्हिडिओ एकदा पहा. शेतकरी पुत्रांनी तयार केलेला हा रोबोट इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणार असून, चार्जिंगनंतर साधारणतः एक तास बागेत फवारणी करू शकतो असा दावा केला जातं आहे.या आधुनिक फवारणी यंत्रात फोर व्हीलर एस एन जे बी महाविद्यालयातील नामदेव पवार, जगदीश गांगुर्डे, अमित कोतवाल, अमोल ठाकरे या शेतकरी पुत्रांनी या रोबोटची निर्मिती केली आहे. यासाठी त्यांना प्रा. एस. पी. इंगळे यां

CURRICULUM VATTAE

                   CURRICULUM VATTAE Pavan Murlidhar Bmobale                                            Contac no..9545973814 E-mail I'd.📨..Pavanbombale1991@gmail.com Adress....      At Digars TQ; Parbhani.Dist.. Parbhani  EDUCATION QUALIFICATION  Diploma In Pharmacy. 10th ...    69%                 (2016 March) 12th....    72.92%.           (2018 Feb) D pharm...     74.90%      first class (2021 April) MSCIT.......      65%.        (Jun 2018) Passed in sept 2021with first class from Elixir institute of pharmacy college of pune. Software skill MSCIT. certificate STRENTHS: Able to work in a team to achive targets. Sincere at work and responsibility. Good communication skills & problem solving skills. PERSONAL PROFILE: Name...Pavan Murlidhar bombale. DoB..4/01/1999 Father.... Murlidhar raghuji bomblae Brother....  Sunil Bombale Sister........  Rekha bomblae Mother....    Kushawartha   Language proficiency.   English marathi Hindi Marital status: Single Blood group B+ve Nationali

सख्या बहिणी बनल्या PSI, घरातील चौघेही अधिकारी; अंजली बाबर राज्यात दुसऱ्या

Image
  सख्या बहिणी बनल्या PSI, घरातील चौघेही अधिकारी; अंजली बाबर राज्यात दुसऱ्या सोलापूर.  कोंढारपट्टा नेवरे तालुका माळशिरस येथील हरिदास बाबर यांच्या दोन्ही कन्या कौशल्या हरिदास बाबर व अंजली हरिदास बाबर या दोघींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या PSI परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. त्या दोघी कोंढारपट्टा गावचे माजी सरपंच तात्यासाहेब बाबर यांच्या बहिणी आहेत. अंजली बाबर हिने महाराष्ट्रामध्ये मुलीमधून ४०८ गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला आहे.  अंजली बाबर हिने उच्च शिक्षण घेण्यासाठी बारामती येथे अकरावी, बारावी शिक्षण घेतले आणि त्यानंतर पुणे येथे मॉडर्न कॉलेज येथे बीसीएस केले, तर कौशल्या बाबर हिने शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय माळेवाडी अकलूज येथे अकरावी, बारावी शिक्षण घेतले.  त्यानंतर मेथवडे येथे बी फार्मसी केले. त्यानंतर बारामती माळेगाव येथे एम फार्मसी केले व त्यानंतर अंजली व कौशल्या हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.  सात वर्षे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास करून यावर्षी दोघी बहिणींनी पोलिस उपनिरीक्षक बनल्या आहेत. हरिदासांची सूनही कृषी उपसंचाल

अधिकारी झाल्यावर तिने नवऱ्याला सोडणं बरोबर की चुकीचं?

Image
अधिकारी झाल्यावर तिने नवऱ्याला सोडणं बरोबर की चुकीचं? ज्योती मौर्य ही उत्तर प्रदेशमधली राज्य सरकारच्या सेवेत काम करणारी अधिकारी. सध्या ती समाजमाध्यमांमध्ये आणि बातम्यांमध्ये जोरदार चर्चेत आहे ती तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे. ज्योती मौर्य ही उत्तर प्रदेशमधली राज्य सरकारच्या सेवेत काम करणारी अधिकारी.  सध्या ती समाजमाध्यमांमध्ये आणि बातम्यांमध्ये जोरदार चर्चेत आहे ती तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे. ज्योती शिकली आणि आपल्या हुषारीच्या बळावर २०१५ मध्ये उपविभागीय दंडाधिकारी झाली.   या जोडप्याला जुळ्या मुलीही झाल्या आहेत. २०२० पर्यंत दोघांमध्ये सगळं उत्तम सुरू होतं.  पण ज्योतीच्या आयुष्यात तिसऱ्या कुणीतरी प्रवेश केला आणि तीन वर्षांत परिस्थिती बदलत गेली.  आता आलोकने आपली पत्नी ज्योतीच्या डायरीमधली काही पानं समाजमाध्यमांवर टाकली आहेत.  त्यातले तपशील बघितले, तर त्यानुसार ज्योती दर महिन्याला अवैध पद्धतीने सहा लाख रुपये कमावताना दिसते. ज्योतीचा मित्र आणि भाऊ मिळून आपली हत्या करू शकतात, आपल्या जीवाला धोका आहे, असं आलोक मौर्यचं म्हणणं आहे, तर नवऱ्याने ५० लाख रुपये आणि घर यासाठी तगादा लावला आहे, असा आरो

समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात; २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

Image
समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात; २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.  बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर  विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाला झोप लागल्याने बस थेट डिव्हायरला धडकली. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. सिंदखेडराजा ( परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते.  बसमधील जखमींना तातडीने उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून ३३ प्रवाशी प्रवास करीत होते.  बुलढाण्याजवळीच सिंदखेडराजा परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायरला धडकली आणि रस्त्यावरच उलटली.  हा अपघात इतका भीषण होता की, क्षणार्धात बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विदर