अधिकारी झाल्यावर तिने नवऱ्याला सोडणं बरोबर की चुकीचं?
अधिकारी झाल्यावर तिने नवऱ्याला सोडणं बरोबर की चुकीचं?
ज्योती मौर्य ही उत्तर प्रदेशमधली राज्य सरकारच्या सेवेत काम करणारी अधिकारी. सध्या ती समाजमाध्यमांमध्ये आणि बातम्यांमध्ये जोरदार चर्चेत आहे ती तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे.
ज्योती मौर्य ही उत्तर प्रदेशमधली राज्य सरकारच्या सेवेत काम करणारी अधिकारी.
सध्या ती समाजमाध्यमांमध्ये आणि बातम्यांमध्ये जोरदार चर्चेत आहे ती तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे.
ज्योती शिकली आणि आपल्या हुषारीच्या बळावर २०१५ मध्ये उपविभागीय दंडाधिकारी झाली.
या जोडप्याला जुळ्या मुलीही झाल्या आहेत. २०२० पर्यंत दोघांमध्ये सगळं उत्तम सुरू होतं.
पण ज्योतीच्या आयुष्यात तिसऱ्या कुणीतरी प्रवेश केला आणि तीन वर्षांत परिस्थिती बदलत गेली.
आता आलोकने आपली पत्नी ज्योतीच्या डायरीमधली काही पानं समाजमाध्यमांवर टाकली आहेत.
त्यातले तपशील बघितले, तर त्यानुसार ज्योती दर महिन्याला अवैध पद्धतीने सहा लाख रुपये कमावताना दिसते.
ज्योतीचा मित्र आणि भाऊ मिळून आपली हत्या करू शकतात, आपल्या जीवाला धोका आहे, असं आलोक मौर्यचं म्हणणं आहे, तर नवऱ्याने ५० लाख रुपये आणि घर यासाठी तगादा लावला आहे, असा आरोप करत ज्योतीने घटस्फोट मागितला आहे.
आलोकने आपल्याला अधिकारी होण्यासाठी मदत केली, हेपण ती आता मान्य त्यात आलोकने तिचे आणि तिच्या मित्राचे व्हॉट्सअॅप चॅट समाज माध्यमांवर टाकल्यामुळे त्यांचं प्रेमप्रकरण, ते एकमेकांना काय म्हणून संबोधतात, याचीच लोकांनी जोरदार चर्चा सुरू केली. त्यात ज्योती मौर्यचा कथित मित्र मनीष दुबेची चौकशी सुरू झाली आहे.
नुकत्याच महाराष्ट्रात घडून गेलेल्या दर्शना पवार प्रकरणातही वन खात्यात अधिकारी म्हणून निवड झाल्यावर तिने लग्नाला नकार दिला म्हणून सगळा पुढचा अनर्थ घडला, याचीच चर्चा समाजमाध्यमांमधल्या कमेंटस् मध्ये दिसत होती.
तयार नाही.
त्या पार्श्वभूमीवर ज्योती मौर्यच्या प्रकरणाकडे कसं बघायचं?
ज्योती मौर्यचं हे वागणं बरोबर की चुकीचं हे ठरवायचा आपल्याला अधिकार नसला, तरीही आपलं सामाजिक स्थान बदलल्यावर आधीची बायको आवडत नाही, आपल्याला शोभत नाही, म्हणून तिला सोडून, टाकून दुसरं लग्न केलेल्या पुरूषांची किती तरी उदाहरणं आहेत. तेव्हा त्यांच्यावर टीका केली गेली असेल का? की कर्तृत्ववान पुरूषाने असंच वागायचं असतं, असं म्हटलं गेलं असेल?
Comments
Post a Comment