महिन्याभरातच टोमॅटो ने केले करोडपती, या शेतकऱ्याला लागली लॉटरी!

 महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने टोमॅटो या पिकातून कमवले 1.5 कोटी..



Tomato Price : महिन्याभरातच टोमॅटो ने केले करोडपती, या शेतकऱ्याला लागली लॉटरी!


दरवर्षी भाव नसल्याने रस्त्यावर फेकून दिल्या जाणाऱ्या टोमॅटोने आता कमाल केली आहे. टोमॅटोने झेप घेतल्याने अनेक शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. 
हा शेतकरी तर अवघ्या एका महिन्यात करोडपती झाला आहे
अनेक जण नशीब आजमावतात, त्यांना लॉटरी लागते. त्यांचे नशीब उघडते. पण या शेतकरी दाम्पत्याने मेहनतीच्या आणि संधीच्या जोरावर दौलत खेचून आणली आहे. 
टोमॅटोचे भाव (Tomato Price Hike) सध्या आकाशाला भिडले आहेत. भाव नसल्याने दरवर्षी रस्त्याच्या कडेला टोमॅटो फेकून द्यावा लागत होता
जून्नरमधील शेतकरी करोडपती
पुणे आणि नगर जिल्ह्यातील सीमेवर जून्नर तालुका आहे. हा तालुका ग्रीन बेल्ट नावाने राज्यात ओळखल्या जातो. 
या तालुक्यात अनेक प्रयोगशील शेतकरी आहे. मुबलक पाणी आणि कल्पकतेच्या जोरावर येथील शेतकऱ्यांचे अनेक प्रयोग राज्यभर गाजले आहे. राज्यातील सर्वांधिक पाणलोट आणि सिंचन याच तालुक्यात आहे. तर याच गावातील शेतकऱ्याने टोमॅटो विक्रीतून तीस दिवस कोट्यावधी रुपये कमावले आहे

.काळ्या मातीत मातीत

जून्नर तालुक्यातील माती काळीशार आहे. वर्षभर खेळते पाणी आहे. या क्षेत्रात कांदा आणि टोमॅटोचे मोठे उत्पादन होते. सध्या टोमॅटो महागला आहे. त्याचा या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. टोमॅटोने या तालुक्यातील शेतकऱ्यांचे नशीब पालटवले आहे. शेतकरी तुकराम गायकर यांच्या मेहनतीला गोडवा आला आहे.

Comments

Popular posts from this blog

अक्षय चौरे यांच्या शेतातील कामाचा विक्रम

शेती कामासाठी लागणारे जुगाड

सख्या बहिणी बनल्या PSI, घरातील चौघेही अधिकारी; अंजली बाबर राज्यात दुसऱ्या