समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात; २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू



समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात; २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू


विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.
 बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर  विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे.
चालकाला झोप लागल्याने बस थेट डिव्हायरला धडकली. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे.
सिंदखेडराजा ( परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
 बसमधील जखमींना तातडीने उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून ३३ प्रवाशी प्रवास करीत होते. 
बुलढाण्याजवळीच सिंदखेडराजा परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायरला धडकली आणि रस्त्यावरच उलटली.
 हा अपघात इतका भीषण होता की, क्षणार्धात बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून ३३ प्रवाशी प्रवास करीत होते. बुलढाण्याजवळीच सिंदखेडराजा परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायरला धडकली आणि रस्त्यावरच उलटली. 
हा अपघात इतका भीषण होता की, क्षणार्धात बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला.
या भीषण अपघातात (Accident News) बसमधील २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
तर काही प्रवासी जखमी आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. 
चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

सख्या बहिणी बनल्या PSI, घरातील चौघेही अधिकारी; अंजली बाबर राज्यात दुसऱ्या

Tata Group करणार भारतातील पहिल्या iphone ची निर्मिती; ऑगस्ट महिन्यात करार होणार पुर्ण

महिन्याभरातच टोमॅटो ने केले करोडपती, या शेतकऱ्याला लागली लॉटरी!