Tata Group करणार भारतातील पहिल्या iphone ची निर्मिती; ऑगस्ट महिन्यात करार होणार पुर्ण

Tata Group करणार भारतातील पहिल्या iphone ची निर्मिती; ऑगस्ट महिन्यात करार होणार पुर्ण


बिझनेसनामा ऑनलाईन । सध्या टाटा समूह (Tata Group) देशातील मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर जास्त प्रमाणात भर देत आहे. नुकतीच टाटा समूहासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. टाटा समूह आता आयफोन निर्मितीच्या मार्गावर आहे. यासंदर्भात टाटा समूह कर्नाटकमधील विस्ट्रॉन कॉर्पसोबत करार करण्याच्या तयारीत आहेत. हा करार ऑगस्ट महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
14 आयफोन मॉडलचे असेंम्बलिंग करणार – (Tata Group)
जर या दोन्ही कंपन्यांचा करार निश्र्चित झाला तर टाटा समूह (Tata Group)आयफोन निर्माण करणारी भारतातील पहिली कंपनी ठरेल. त्यामुळे लवकरच आपल्याला बाजारात टाटा समूहाचा पहिला आयफोन पाहिला मिळू शकतो. मुख्य म्हणजे, या प्रकल्पाचे मुल्य ६० कोटी डॉलरपेक्षा अधिक असेल. तसेच या प्रकल्पात १४ आयफोन मॉडलचे असेंम्बलिंग केले जाईल.
10, 000 पेक्षा अधिक लोकांना बेरोजगार मिळणार-
टाटा समूहाच्या या करारामुळे देशातील १०,००० पेक्षा अधिक लोकांना बेरोजगार मिळणार आहे. पुढील वर्षापर्यंत कर्नाटक येथील प्रकल्पात १.८ अब्ज डॉलर आयफोन तयार केले जातील. यासाठी केंद्र सरकारकडून देखील कंपनीला भत्ता देण्यात येईल. या सर्व प्रकल्पासाठी मनुष्यबळ लागणार आहे. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळेल.
आता विस्ट्रॉन कंपनी देखील भारतातील आयफोनच्या व्यवसायातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे, यामुळे विस्ट्रॉन येथील प्लँट टाटा समूहाकडे येऊ शकतो. याबाबत अधिक खूलासा झाला नसला तरी टाटा समूहाची या करारासाठी विस्ट्रॉन आणि ॲप्पलसह बोलणी सुरु आहे. यातून टाटा समूह (Tata Group) आता इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात देखील पुढे येत असल्याचे दिसत आहे. दरम्यान टाटा समूहाने यापूर्वी देखील भारतातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. आता टाटा समूहाच्या या नवीन करारामुळे देशातील अनेकजणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. त्यामुळे आता टाटा समूहाचा विस्ट्रॉन कॉर्पसोबत करार कधी पुर्ण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Comments

Popular posts from this blog

अक्षय चौरे यांच्या शेतातील कामाचा विक्रम

शेती कामासाठी लागणारे जुगाड

सख्या बहिणी बनल्या PSI, घरातील चौघेही अधिकारी; अंजली बाबर राज्यात दुसऱ्या