शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी

 शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी

आता शेतकऱ्यांना दरवर्षाला 6 हजार नाही तर 12000 रुपये मिळणार; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय


शेतकरी वर्गाला दिलासा देणारी बातमी. शेतकऱ्यांसाठीच्या राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेवर (Namo shetkari mahasanman) आज मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब झाला आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेद्वारे (pm kisan yojna) वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. यासोबत आता नमो शेतकरी योजनेद्वारे (Namo farmer scheme) सरकारकडून शेतकऱ्यांना अतिरक्त सहा हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत. केंद्र व राज्य असे दोन्ही मिळून दरवर्षी 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर (farmer news) जमा होणार आहेत.

नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी या बाबी बंधनकारक :

  • 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा जमीनधारक शेतकरीच पात्र
  • सन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागेल
  • लाभार्थीने त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी

Comments

Popular posts from this blog

सख्या बहिणी बनल्या PSI, घरातील चौघेही अधिकारी; अंजली बाबर राज्यात दुसऱ्या

Tata Group करणार भारतातील पहिल्या iphone ची निर्मिती; ऑगस्ट महिन्यात करार होणार पुर्ण

महिन्याभरातच टोमॅटो ने केले करोडपती, या शेतकऱ्याला लागली लॉटरी!