सख्या बहिणी बनल्या PSI, घरातील चौघेही अधिकारी; अंजली बाबर राज्यात दुसऱ्या सोलापूर. कोंढारपट्टा नेवरे तालुका माळशिरस येथील हरिदास बाबर यांच्या दोन्ही कन्या कौशल्या हरिदास बाबर व अंजली हरिदास बाबर या दोघींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या PSI परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. त्या दोघी कोंढारपट्टा गावचे माजी सरपंच तात्यासाहेब बाबर यांच्या बहिणी आहेत. अंजली बाबर हिने महाराष्ट्रामध्ये मुलीमधून ४०८ गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला आहे. अंजली बाबर हिने उच्च शिक्षण घेण्यासाठी बारामती येथे अकरावी, बारावी शिक्षण घेतले आणि त्यानंतर पुणे येथे मॉडर्न कॉलेज येथे बीसीएस केले, तर कौशल्या बाबर हिने शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय माळेवाडी अकलूज येथे अकरावी, बारावी शिक्षण घेतले. त्यानंतर मेथवडे येथे बी फार्मसी केले. त्यानंतर बारामती माळेगाव येथे एम फार्मसी केले व त्यानंतर अंजली व कौशल्या हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. सात वर्षे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास करून यावर्षी दोघी बहिणींनी पोलिस उपनिरीक्षक बनल्या आहेत. हरिदा...
अधिकारी झाल्यावर तिने नवऱ्याला सोडणं बरोबर की चुकीचं? ज्योती मौर्य ही उत्तर प्रदेशमधली राज्य सरकारच्या सेवेत काम करणारी अधिकारी. सध्या ती समाजमाध्यमांमध्ये आणि बातम्यांमध्ये जोरदार चर्चेत आहे ती तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे. ज्योती मौर्य ही उत्तर प्रदेशमधली राज्य सरकारच्या सेवेत काम करणारी अधिकारी. सध्या ती समाजमाध्यमांमध्ये आणि बातम्यांमध्ये जोरदार चर्चेत आहे ती तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे. ज्योती शिकली आणि आपल्या हुषारीच्या बळावर २०१५ मध्ये उपविभागीय दंडाधिकारी झाली. या जोडप्याला जुळ्या मुलीही झाल्या आहेत. २०२० पर्यंत दोघांमध्ये सगळं उत्तम सुरू होतं. पण ज्योतीच्या आयुष्यात तिसऱ्या कुणीतरी प्रवेश केला आणि तीन वर्षांत परिस्थिती बदलत गेली. आता आलोकने आपली पत्नी ज्योतीच्या डायरीमधली काही पानं समाजमाध्यमांवर टाकली आहेत. त्यातले तपशील बघितले, तर त्यानुसार ज्योती दर महिन्याला अवैध पद्धतीने सहा लाख रुपये कमावताना दिसते. ज्योतीचा मित्र आणि भाऊ मिळून आपली हत्या करू शकतात, आपल्या जीवाला धोका आहे, असं आलोक मौर्यचं म्हणणं आहे, तर नवऱ्याने ५० लाख रुपये आणि घर या...
शेतकऱ्याच्या पोरांचा नांदच खुळा..! शेतकऱ्यांसाठी शोधलं अत्याधुनिक फवारणी यंत्र, हा बारामाही चालणारा व्यवसाय आहे. शेतीमध्ये पिकांच्या वाढीसाठी आणि रोगापासून पिक संरक्षणासाठी नेहमीच वेगवेगळ्या कीटकनाशकांची (Pesticides) फवारणी शेतकरी बांधवांना (Farmer) करावी लागते. शिवाय अनेक तणनाशकांची आणि बुरशीनाशकांची देखील फवारणी शेतकऱ्यांना करावी लागते. त्यामध्ये असलेले खतरनाक रासायनिक घटकांमुळे अनेकदा फवारणीच्या वेळी शेतकऱ्यांच्या आरोग्याला गंभीर परिणाम होतात. शेतकरी बांधवांना फवारणी करताना या समस्येला तोंड द्यावे लागतं असल्याने नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या शेतकऱ्याच्या पोरांनी चक्क अत्याधुनिक फवारणी विकसित केले आहे ह्या यंत्राचा पूर्ण व्हिडिओ एकदा पहा. शेतकरी पुत्रांनी तयार केलेला हा रोबोट इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणार असून, चार्जिंगनंतर साधारणतः एक तास बागेत फवारणी करू शकतो असा दावा केला जातं आहे.या आधुनिक फवारणी यंत्रात फोर व्हीलर एस एन जे बी महाविद्यालयातील नामदेव पवार, जगदीश गांगुर्डे, अमित कोतवाल, अमोल ठाकरे या शेतकरी पुत्रांनी या रोबोटची निर्मिती केली आहे. यासाठी त्यांना प्रा. एस. पी. इंगळे...
Comments
Post a Comment