सख्या बहिणी बनल्या PSI, घरातील चौघेही अधिकारी; अंजली बाबर राज्यात दुसऱ्या सोलापूर. कोंढारपट्टा नेवरे तालुका माळशिरस येथील हरिदास बाबर यांच्या दोन्ही कन्या कौशल्या हरिदास बाबर व अंजली हरिदास बाबर या दोघींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या PSI परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. त्या दोघी कोंढारपट्टा गावचे माजी सरपंच तात्यासाहेब बाबर यांच्या बहिणी आहेत. अंजली बाबर हिने महाराष्ट्रामध्ये मुलीमधून ४०८ गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला आहे. अंजली बाबर हिने उच्च शिक्षण घेण्यासाठी बारामती येथे अकरावी, बारावी शिक्षण घेतले आणि त्यानंतर पुणे येथे मॉडर्न कॉलेज येथे बीसीएस केले, तर कौशल्या बाबर हिने शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय माळेवाडी अकलूज येथे अकरावी, बारावी शिक्षण घेतले. त्यानंतर मेथवडे येथे बी फार्मसी केले. त्यानंतर बारामती माळेगाव येथे एम फार्मसी केले व त्यानंतर अंजली व कौशल्या हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. सात वर्षे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास करून यावर्षी दोघी बहिणींनी पोलिस उपनिरीक्षक बनल्या आहेत. हरिदासांची सूनही कृषी उपसंचाल
Comments
Post a Comment